ऐतिहासिक दुर्मिळ ग्रंथ वृत्तपत्रे पोस्टर प्रदर्शन.

Posted on: October 2nd, 2022 by Dr Dattatraya Kharatmol No Comments

श्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालय लातूर व कुमा स्वामी महाविद्यालय, औसा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्षानिमित्त महाविद्यालयात दुर्मिळ ग्रंथ, वृत्तपत्रेपोस्टर, हस्तलिखिते यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून कुमारस्वामी महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. सुनील पुरी, प्रदर्शनाचे आयोजक संयोजक डॉ. बी.ए. कांबळे, डॉ. विजयकुमार मेकेवाड व इतर प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. इतिहास जपण्याच्या प्रयत्नातून विद्यार्थी शिक्षक नागरिकांना इतिहासकालीन दुर्मिळ वस्तूंची माहिती व्हावी. या हेतूने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक त्यांच्याविषयीचे दुर्मिळ माहितीचे पोस्टर, वृत्तपत्रे यांचा समावेश करण्यात आला होता. आपली वाचन संस्कृती तसेच विचारांची उंची वाढविण्यासाठी 2000 पेक्षा अधिक दर्जेदार दुर्मिळ ग्रंथांचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला होता. यामध्ये हैदराबाद मुक्तिसंग्रामासंदर्भात अनेक प्राध्यापकांची पी.एचडी. व एम.फील.चे संदर्भ प्रबंध, त्याचबरोबर हैदराबाद गॅझेट, माझी आठवण, राष्ट्रीय हिप्परगाची शाळा, देवीसिंग चव्हाण आणि बाबासाहेब परांजपे स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय सहभाग घेतलेल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकावर लिहिले गेलेले ग्रंथ या प्रदर्शनात समावेश होता.

 याप्रसंगी डॉ. सुनील पुरी, डॉ. बी. ए. कांबळे, डॉ. विजयकुमार मेकेवाड यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथ, पोस्टर वृत्ताविषयी मार्गदर्शन केले. लातूरमधील रोकडेश्वर विद्यालय, इतर शाळांनी व नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते, पोस्टर, वृत्तपत्रे यांची माहिती घेतली.  यावेळी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

postars pradarshan photo

 

 

Leave a Reply